बजाज सीटी 100 इएसचे अलॉय व्हेरियंट सादर

बजाज कंपनीची सीटी 100 इएस या मॉडेलचे अलॉय व्हेरियंट बाजारपेठेत दाखल झाले आहे. याचे एक्स-शोरूम मूल्य 41,997 रूपये इतके आहे. हे नवीन मॉडेल सीटी 100 इएइ या मॉडेलची सुधारित आवृत्ती आहे. या नवीन व्हेरियंटमध्ये अलॉय व्हिल्स प्रदान करण्यात आले आहेत. यातील अन्य फिचर्स हे आधीप्रमाणेच असतील. अर्थात बजाज सीटी 100 इएस अलाँ या मॉडेलमध्ये 99.27 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर एयर कुल्ड इंजिन देण्यात आले असून ते 4 स्पीड गिअर्सला संलग्न करण्यात आले आहे. याच्या दोन्ही व्हिल्सला ड्रम ब्रेक प्रदान करण्यात आले आहेत.

बजाज कंपनीची सीटी ही मालिका अत्यंत किफायतशीर दरातल्या विविध व्हेरियंटसाठी प्रसिद्ध आहे.