रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना जामीन मंजूर

remdesivir

औरंगाबाद : रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दिनेश कान्हु नवगीरे, रवि रोहिदास डोंगरे , संदीप सुखदेव रगडे , प्रविण शिवनाथ बोर्डे , नरेंद्र मुरलीधर साबळे आणि अफरोज खान इकबाल खान या सहा आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी प्रत्येकी २५ हजाराच्या जातमुचलक्यावर शनिवारी सशर्त जामीन मंजूर केला .

रेमडीसीवीर इंजेकशनचा काळा बाजार करणारे रॅकेट गुन्हे शाखेने २६ एप्रिल रोजी

उघडकीस आणले होते. आरोपी विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीना १ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. वाढीव पोलीस कोठडीच्या मागणीसह आरोपीना न्यायालयात हजार करण्यात आले असता न्यायालयाने पोलीसांची मागणी फेटाळून आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

दरम्यान आरोपींच्या वतीने अॅड. अभयसिंह भोसले, अॅड. अमित गायकवाड ,अॅड. प्रवीण कांबळे व अॅड खिझर पटेल यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले. आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला की, जीवनावश्यक वस्तू कायद्यांर्गत गुन्हा दाखल असल्याने भादंवीचे कलम ४२० आरोपींविरोधात लागू होत नाही .तसेच बनावट ग्राहक व इतर साक्षीदार पोलीस खात्यातील कर्मचारी असून फिर्यादी देखील औषध निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे आरोपी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही. सर्व कलम न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत असल्याने जामीन देण्यास हरकत नाही .

सुनावणीअंती न्यायालयाने सर्व आरोपीना प्रत्येकी २५००० रुपयाच्या जातमुचलक्यावर, आरोपींनी दर सोमवारी ११ ते २ या वेळेत बेगमपुरा ठाण्यात हजेरी लावावी यासह इतर अटीवर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

महत्वाच्या बातम्या