भाजपमधील बहुजन कार्यकर्ते बंडाच्या पावित्र्यात

Bahujan activists of BJP

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद भाजपमधील बहुजन समाजातील तरूण प्रचंड अस्वस्थ आहे. ही पिढी संघिष्ठ ब्राम्हणी नेतृत्वाच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक समरसता मंचाच्या ‘कुळकर्ण्याला’ पुन्हा एकदा ‘माधव सेना’ स्थापन करण्याची जबाबदारी दिली खरी पण त्यानेच बहुजनांमध्ये वाद सुरू केलेत. दुदैवाने त्याला भाजप प्रदेशाध्यक्षांची आणि शिक्षण मंत्र्यांची साथ आहे.
ही सगळी परिस्थिती भाजपमधील स्व. गोपिनाथ मुंडे सर्मथकांना अस्वस्थ करणारी आहे. त्यात महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडेंची केलेली राजकीय कोंडी हे अस्वस्थतेचे आणखी एक कारण आहे. या संदर्भात सोशल मिडियावर ‘ओव्हर अॅक्टिव्ह’ असणारे भाजप कार्यकर्ते आपली नाराजी थेट व्यक्त करता आहेत. या काॅमेंटची भाषा गेल्या काही दिवसात आक्रमक झाली आहे. यावरून ही बहुजन समाजातील भाजप प्रणित तरूण कोणत्याही क्षणी बंड करू शकतात.

काय आहे ‘माधव सेना’?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा म्हणून ‘जनसंघाची’ स्थापना झाली. पण या जन संघाला खऱ्या अर्थाने जनाधार मिळत नव्हता. हा फक्त भट-बनियांचा पक्ष असल्याची भावना सर्व सामान्य लोकांमध्ये होती. या प्रतिमेमुळे पक्षाची मर्यादीत स्वरूपाची वाढ झाली होती. तळागाळातील समाजापर्यत पक्ष कार्य पोहोचत नव्हते. पक्षाची ‘शहरी’ छबी दृढ होत चालली होती. ती तोडण्यासाठी वसंतराव भागवतांनी प्रा. ना.स. फरांदे, अण्णा डांगे आणि गोपिनाथ मुंडे यांना सोबत घेऊन ‘मा-माळी (प्रा. फरांदे), ध-धनगर (अण्णा डांगे) आणि व-वंजारी (गोपिनाथ मुंडे) अशी ‘माधव सेना’ स्थापन केली. त्यामध्ये गोपिनाथ मुंडे यांनी संपूर्ण राज्यात ओबीसींची प्रतिमा धारण करून ते त्यांचे नेतेही झाले. हा प्रयोग यशस्वी झाला. म्हणून दूसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बसविले. त्यामुळे पुन्हा भाजपची वाटचाल भट-बनियाँचा पक्ष असे होते की काय असे वाटल्याने भाजपने पुन्हा ओबीसींची मोट बांधण्यासाठी औरंगाबाद (संघवाल्यांसाठी संभाजीनगर) मधून सामाजिक समरसता मंचाच्या डाॅ. दिवाकर कुलकर्णींना ही जबाबदारी सोपवावी.
हे दिवाकर कुलकर्णी म्हणजे संघाच्या उस्मानपुरा भागातील उस्ताद लहूजी साळवे आरोग्य केंद्र चालविणारे. त्यांनी दलितांच्या जाती-जातींमध्ये फुट पाडली. त्यांनी आता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘सिनेट’ आणि ‘एमसी’ मेंबर निवडण्यातही जाणिवपुर्वक बहुजन समाजातील विशेषतः मागासवर्गीयांना डावलले आहे.

भाजपाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे व राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचाही त्यांना पाठिंबा आहे.
मुंडे द्वेषाचा बळी बनले डॉ. गजानन सानप

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर एकही सदस्य नसताना स्व गोपीनाथ मुंडेंच्या नावाने राष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात यशस्वी ठरलेले गजानन सानप यांचा बळी मुंडे द्वेषापोटी झाल्याचे समोर येत आहे.
गेल्या 22 वर्षांपासून सातत्याने विद्यापीठामध्ये सक्रीय चळवळीमध्ये असणारे गजानन सानप यांना डावलून सत्तेच्या आधारावर कोणत्याही कार्यामध्ये योगदान नसणारे केवळ सत्तेच्या जोरावर काम करत राहणारे पदाधिकाऱ्याच्या मर्जीतून निवड झाल्याचे स्पष्ट होत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाला चार वर्षांचा कालावधी पूर्ण होत असतानाही अजूनही त्यांचा धसका या लोकांनी सोडलेला दिसत नाही. भाजपमधील मुंडे द्वेषी लोकांच्या पुढाकारातून अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण केले जात आहे.
गोपीनाथ मुंडे ग्रामीण संस्था विद्यापीठात स्थापन होऊन तीन वर्षे होत आली तरी अजूनही सरकारच्या वतीने कुठलेही आर्थिक तरतूद करण्यात आली नाही उलटपक्षी यासाठी काम करणाऱ्या गजानन सानप यांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीमध्ये सातत्याने मुंडेंचे विश्वासू म्हणून ओळख असणारे शिरीष बोराळकर, बसवराज मंगरुळे, रमेश पोकळे यांची नावे पद्धतशीरपणे बाजूला ठेवून मुंडे विरोधाचा संदेश देण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे.

यांच्यासोबत मनोज शेवाळे, योगिता तौर, प्राध्यापक गजानन सानप, सुधीर घुमरे नाना गोडबोले, देविदास पाठक, सुनिल जाधव, अरविंद केंद्रे, प्रशांत पाटील तसेच औरंगाबाद, ,बीड, उस्मानाबाद यथील सर्व तालुक्यात अभाविपचे प्रतिकुल परिस्थितीत काम करणारे कार्यकर्ते होते त्यांच्यापैकी कुणा एकाचीही निवड झाली असती तरी परिषद कार्यकर्ता म्हणुन आनंद झाला असता. आता एकही परिषदेचे सक्रिय काम केलेला विद्यापीठ सिनेटवर नाही. खुप खेद तर वाटतोच पन मनाला वेदना जास्त होतात कारण सदैव उपेक्षित राहणारा विचार आज मुख्य प्रवाहात आला होता पन स्वार्थ व द्वेष आडवा आला. याचा संताप भाजप मधील दलित कार्यकर्ते बंडाची भाषा करीत आहेत.