‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटियावर चाहत्याने फेकली चप्पल

Tamanna-Bhatia

हैदराबाद : बाहुबली फेम आणि दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाला चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली असून तो बी-टेकमध्ये पदवीधर आहे. आरोपीने तमन्नाच्या दिशेने फेकलेली चप्पल तिथे उभ्या असलेल्या ज्वेलरी शॉपच्या कर्मचा-याला जाऊन लागली.

Loading...

तमन्ना हैदराबादच्या हिमायतनगरमध्ये एका ज्वेलरी शॉपच्या उदघाटनाला गेलेली असताना ही घटना घडली. त्यावेळी तिच्या इतर चाहत्याप्रमाणेच करिमुल्लाह नावाचा तरूणही हा कार्यक्रम पहात होता. त्यावेळी काही कळायच्या आत अचानक त्याने आपला बूट काढून तमन्नाच्या दिशेने भिरकावला. मात्र तमन्नाभोवती बरीच मोठी गर्दी असल्याने तिच्याऐवजी हा बूट तिथे उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याला लागला. तमन्नाने अलीकडे चित्रपटात ज्या भूमिका केल्या आहेत त्या आपल्याला अजिबात आवडलेल्या नाहीत. त्याच रागातून आपण हा हल्ला केला असे आरोपीने पोलिसांना चौकशीत सांगितले. वेगवेगळया कलमांखाली त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.Loading…


Loading…

Loading...