‘कटाप्पाने बाहुबलीला का मारलं’चं उत्तर झालं ‘लीक’

हैदराबाद: ‘कटाप्पाने बाहुबलीला का मारले‘ या प्रश्‍नाचे उत्तर ‘बाहुबली’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने गोपनीय राखण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली आहे. मात्र, तरीही चित्रपटाच्या टीममधीलच एकाने बाहुबलीच्या या रहस्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग असलेली नऊ मिनिटांची व्हिडिओ क्‍लिप ‘लीक‘ केली. या प्रकरणी चित्रपट निर्मात्यांच्या तक्रारीवरून हैदराबाद पोलिसांनी एका ग्राफिक डिझायनरला ताब्यात घेतले आहे.