‘हा’ आहे २०१८ मधील सर्वात महागडा अॅक्शन चित्रपट .

जाणून घ्या कोणता असेल तो चित्रपट

अभिनेता टाइगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांनी ‘बागी२’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. २०१६ मध्ये आलेल्या बागी या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. टाइगर ने ट्विटरवर सेटवरील एक फोटो शेअर केला. त्या फोटोत टाइगर, दिशा, निर्माते साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक अहमद खान दिसत आहेत. आणि बागी२ च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली, असे फोटो कॅप्शन दिले.

bagdure

दिशाने देखील तो फोटो शेअर केला आणि लिहिले,आणि अशाप्रकारे आम्ही बागी२ च्या चित्रीकरणाला सुरुवात केली. बागी२ हा २०१८ मधील सर्वात महागडी अॅक्शन फिल्म आहे. या फिल्ममध्ये अनेक आंतरराष्ट्रीय नृत्यदिग्दर्शक, टेक्निशन यांचा सहभाग आहे. थायलंड, हॉंगकॉंग, लॉस एन्जलिस, अमेरिका आणि चीन या देशातील अनेक टेक्निशन आणि अॅक्शन दिग्दर्शक या चित्रपटात सहभागी आहेत. हा चित्रपट २७ एप्रिल २०१८ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...