औरंगाबाद-जळगाव महामार्गावरून बागडेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

औरंगाबाद : औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम मागील अनेक दोन-तीन वर्षापासून कासवगतीने सुरु असल्याने वाहनधारकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या कामामुळे उडत असलेल्या धुळीमुळे वाहनधारकांना मेटाकुटीस आले आहे. महाराष्ट्र सरकार घाटाच्या परवानग्या देण्यास टाळाटाळ करतंय म्हणून रस्ता बनण्यास वेळ लागत आहे. मी अनेक वेळा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वकीय सहाय्यक यांच्याकडे पाठपुरावा केला. तेव्हा अजिंठा घाटाची परवानगी दिली अजून चौका आणि बिल्डा घाटाची परवानगी येणे बाकी आहे. पावसाळ्यापर्यंत औरंगाबाद-सिल्लोडपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल असे प्रतिक्रिया माजी विधानसभा अध्यक्ष तथा भाजप आ. हरिभाऊ बागडे यांनी दिली.

शासनाच्यावतीने कोट्यावधी रुपये रस्त्याच्या कामासाठी खर्च करण्यात येत आहे. परंतु याकडे प्रशासनाच्या दुर्लक्षाने महामार्गाच्या कामात वेगवेगळा खोडा घातल्या जात आहे. या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या हस्तक्षेपामुळे कंत्राटदार टिकत नसल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली होती. तर त्यांच्या हस्तक्षेपामुळे ही बाब बंद होऊन मागील काही दिवसापासून काम पूर्ववत सुरु होते. मध्यंतरी कोरोना काळात काम बंद होते. पुन्हा काम सुरु झाल्यानंतर देखील काम अत्यंत कासवगतीने सुरु आहे. यामुळे वाहनधारकांबरोबर परिसरातील नागरिक देखील धुळीने वैतागले आहे.

दोन आठवड्यापूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याने फुलंब्री तालुक्यात दौरा केला होता. त्यावेळी फुलंब्री शहरातील खुलताबाद रोडवर वाहनांची एकच रांग लागल्याने वाहतुक कोंडी झाली होती. यावर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर तैनात असून देखील वाहनांची कोंडी झालेली बघायला मिळाली होती. औरंगाबाद-जळगावचे महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. परंतु यात फुलंब्री टी पोइंटवर बसस्थानक परिसरात काळीपिवळी अशी वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने वाहतुक कोंडी होत आहे. या कोंडीकडे पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी वाहनधारक तसेच नागरिक करीत आहे.

याविषयी फुलंब्री मतदारसंघाचे आ. बागडे यांनी सांगितले की, डांबरीकरण सारखे सिमेंट रस्त्याचे काम सोपे नसते त्यामुळे कामाला अधिक काळ लागत आहे. पावसाळ्याच्या अगोदर औरंगाबाद ते सिल्लोड पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल. सरकारच्या परवानगी दिरंगाईमुळे रस्त्याच्या कामाला उशीर होत असल्याचा आरोप देखील बागडे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या