‘बा विठ्ठला’ राज्यात पाऊस बरसू दे रे ! बागडेंचे पांडुरंगा चरणी साकडे

haribhau-bagade

टीम महाराष्ट्र देशा : पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेले लाखो वैष्णव आज पंढरीत विसावले आहेत. तर पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी आता आतुर झाले आहेत. सायंकाळ पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या संतांच्या पालख्या आज विठुरायाच्या नगरीत आपल्या प्रवासाचा थकवा घालवणार आहेत. तर हरिमानाच्या गजरात तल्लीन होणार आहेत. तर आज महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देखील पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेतले आहे.

Loading...

यावेळी हरिभाऊ बागडे यांनी दैनिक लोकमतशी संवाद साधला. ते म्हणाले की, पुण्याहून निघणाऱ्या संत ज्ञानेशवर महाराजांच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी होण्याचे भाग्य आज मला लाभले. आज पर्यंत हा महासोहळा आम्ही दूरदर्शनवर पाहिला आहे. मात्र यंदा प्रत्यक्ष सहभागी झालो. आज दर्शन घेतल्यानंतर पांडुरंगाकडे राज्यात चांगला पाऊस पडू देआणि महाराष्ट्रातील जनता सुख समाधानी होऊ दे, असे साकड घातल आहे.

दरम्यान माऊलींसह वैष्णवांना घेवून आषाढी एकादशीस माहेरच्या ओढीने पंढरीस निघालेल्या संत तुकाराम, संत सोपानदेव, संत ज्ञानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत एकनाथ आदी सुमारे शंभरहून अधिक संतांच्या पालख्या सायंकाळी विसावा पादुका येथील शेवटचा विसावा घेवून रात्री उशीरा पंढरीत दाखल झाल्या आहेत.Loading…


Loading…

Loading...