बदनापूर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात !

बदनापूर/राजेश कानडे : बदनापूर नगरपंचायतमध्ये आज ता. 23 मे रोजी 12 वाजता नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणुक पार पडली असुन नगराध्यक्षपदासाठी भाजपचे प्रदीप साबळे यांना 10 नगरसेवकांनी मतदान केले तर प्रतिस्पर्धी आघाडीच्या उमेदवार श्रीमती प्रीती प्रमोद साबळे यांना 7 मतदान मिळाले आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे प्रदीप साबळे यांनी बाजी मारली तर उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष शेख युनुस शेख लालमिया यांनी उमेदवारी दाखल होती व आघाडीचे नगरसेवक राजेंद्र जैस्वाल यांनी उमेदवारी दाखल होती. परंतु उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शेख युनुस शेख लालमिया यांच्या बाजुने 10 मतदान झाल्याने व प्रतिस्पर्धी आघाडीचे उमेदवार राजेंद्र जैस्वाल यांना ही केवळ 7 मतदान मिळाल्याने शेख युनुस शेख लालमिया यांनी बाजी मारली आहे.

बदनापूर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी शेख युनुस शेख लालमिया यांची दुस-यांदा निवड झाली आहे. नगरपंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप साबळे व उपाध्यक्ष शेख युनुस लालमियां यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.