विजयाच्या जल्लोषात राजस्थानच्या संघासाठी वाईट बातमी; ‘या’ खेळाडूचे आयपीएल खेळणे कठीण

दिल्ली : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स संघाचा ५५ धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ केवळ १६५ धावापर्यंत मजल मारु शकला. धडाकेबाज शतकासाठी राजस्थाचा सलामीवीर जोस बटलरला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

स्पर्धेतील तिसरा विजय मिळवल्यानंतर राजस्थान संघाच्या आनंदात मिठाचा खडा पडला आहे. कारण संघातील इतर खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्याने बदली खेळाडूची मागणी राजस्थान संघाने केली होती. यावेळी संघात दक्षिण आफ्रिका संघाचा फलंदाज वॅन दर डसन याला संधी देण्यात आली होती. मात्र भारतात कोरोनाची परिस्थीती पाहता दक्षिण अफ्रिका देशाकडून त्याला व्हिजा देण्यात आला नाही. भारतातील कोरोनाची परिस्थीती पाहुन त्याला व्हिजा नाकारण्यात आला अशी माहिती समोर येत आहे.

यामुळे राजस्थानच्या संघासमोरील अडचणीमध्ये वाढ होत आहे. युवा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत ३ विजय मिळवले आहेत. तर ४ सामन्यात पराभव स्विकारला आहे. मात्र ४ खेळाडू स्पर्धेतुन बाहेर गेल्याने राजस्थानचा संघ अडचणीत सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या