पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी बॅड न्यूज ! पण…

टीम इंडिया

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला दिवस-रात्र सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांची टी२० मालिका अहमदाबाद येथेच खेळली जाईल. त्यानंतर होणाऱ्या तीन सामन्यांची वनडे मालिका पुणे येथे खेळणे निश्चित झाले होते. मात्र, पुण्यामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने या मालिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता, या वनडे मालिकेविषयी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानची तीन वनडे सामन्यांची मालिका महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर खेळविणे ठरले होते. मात्र, काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने हे सामने इतरत्र खेळण्याविषयी हालचाली सुरू झाल्या होत्या. या सर्व हालचाल इन दरम्यान आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

एका अग्रगण्य क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही वनडे मालिका पुणे येथे खेळण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या मालिकेसाठी प्रेक्षकांना मैदानात येण्यास परवानगी नसेल. सर्व सामने हे विनाप्रेक्षक बंद दरवाजाआड खेळले जातील.

महत्त्वाच्या बातम्या