‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; ‘शेवंता’ घेणार का एक्झिट?

‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; ‘शेवंता’ घेणार का एक्झिट?

Apoorva Nemalekar

मुंबई : टेलिव्हिजनवरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ (‘Ratris Khel Chale 3’) ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. मात्र या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. या मालिकेतील ‘शेवंता’ (Shevanta) ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apoorva Nemalekar) लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘शेवंता’ च्या भूमिकेमुळे अपूर्वा घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात ‘शेवंता’ हे पात्र सर्वांचेच मुख्य आकर्षण ठरले होते. त्यानंतर तिसऱ्या पर्वातही ‘शेवंता’ची लोकप्रियता कमी झालेली नाही. मात्र आता लवकरच ‘शेवंता’ म्हणजेच अपूर्वा ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा समोर येत आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अपूर्वा ही मालिका सोडणार की नाही? याबाबत तिने स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच ती ही मालिका नेमकी का सोडणार याचेही कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे ती खरच ही मालिका सोडणार आहे की नाही? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. दरम्यान अपूर्वा नेमळेकरच्या जागी आता अभिनेत्री कृतिका तुळसकर ही ‘शेवतां’ ची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान सध्या या मालिकेत प्रेक्षकांचे आणखी एका आवडत्या पात्राची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत ‘वच्छी’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील ही सध्या अगदी नव्या लूकमध्ये दिसत आहे. तिच्या हातात काठी, डोक्यावर पांढरा टिळा आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या दिसत आहेत. तिचे पांढरे झालेले केस, पांढऱ्या रंगाची साडी हा लूक पाहून प्रेक्षकही फार भारावले आहेत. आता ‘शेवंता’ च्या बाबतीत काय होणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असून याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुकता दिसत आहे.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे काही फोटो.

 

महत्वाच्या बातम्या: