जालना : अंगणवाडीत खिचडी सोबत शिजवल्या उंदराच्या लेंड्या

blank

जालना, सुदर्शन राऊत : जालना जिल्ह्यात असलेल्या भोकरदन तालुक्यामधील वजीरखेडा येथील अंगणवाडीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेथील असलेल्या अंगणवाडी शाळेमध्ये खिचडीमध्ये उंदीराच्या लेंड्या आणि अळ्या आढळून आल्या आहेत. येथील गावकऱ्यांनी व सरपंच शिलिकराव बुके यांनी तातडीने अंगणवाडी शाळेमध्ये जाऊन चक्क शाळेला कुलूप ठोकले आहे.

blank

येथील अंगणवाडी मध्ये तांदळाचे ऐवजी मुलांना चक्क खिचडीमध्ये आळ्या शिजवून खाऊ घातले जाते कि काय असा प्रश्न येथील पालक वर्गांना पडला आहे. या खिचडीमध्ये उंदराच्या लेंड्या जास्त प्रमाणात आढळून आल्याने पालक वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी अख्ख्या अंगणवाडी लाच कुलूप ठोकले आहे. जोपर्यंत येथील अंगणवाडी सेविका व खिचडी शिजणाऱ्यावर कारवाई होत नाही. तोपर्यंत अंगणवाडी उघडणार नाही. प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती पालकांनी केली.

पुलंच्या घरात लक्ष्मी ऐवजी सरस्वती सापडल्याने चोर पळाले!

सिंहगड महाविद्यालय दुर्घटना : दोषींवर कारवाई करणार, कोणालाही सोडणार नाही : जिल्हाधिकारी