पनवती “महाविकास आघाडी” सरकारमुळे राज्याला वाईट दिवस : निलेश राणे

मुंबई:आपल्या ट्वीट च्या माध्यमातून नेहमीचं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागणारे माजी खासदार निलेश नारायण राणे यांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे.

राणे यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की ” विध्यमान सरकार हे राज्यासाठी पनवती सरकार आहे.हे सरकार सत्तेवर आल्यामुळेच राज्याला वाईट दिवस आले आहेत.

काय म्हणाले निलेश राणे पाहूया त्यांच्याच शब्दात “पनवती मविआ सरकार आल्यापासून महाराष्ट्रात वाईट दिवस आले. सरकार बनवताना आमदार मतदारसंघात ४० दिवस गेलेच नाहीत, नंतर मुख्यमंत्री प्रकल्पाला स्थगिती लावत गेले, कर्जमाफी फक्त २ लाखापर्यंत थोड्या शेतकऱ्यांना दिली ती पण अर्धवट, कोरोनात १ नंबर, अवकाळी व परतीच्या पाऊसमुळे प्रचंड नुकसान झाले.

एकंदरीतच निलेश राणे यांचा सूर हा नेहमी विरोधाचाच राहिला आहे.आजवर त्यांच्या निशाणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राज्यसभा खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधातच राहिला आहे.आपल्या खास शब्द शैलीसाठी निलेश राणे प्रसिद्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या-