Share

Bad Breath | तोंड उघडताच येते दुर्गंधी?, तर करा ‘हे’ सोपे उपाय

टीम महाराष्ट्र देशा: दात व्यवस्थित स्वच्छ न केल्याने बॅक्टेरियासाठी तोंड घर बनून जाते. परिणामी तोंड उघडताच (Bad Breath) दुर्गंधी यायला लागते. साखर आणि स्टार्चने भरलेल्या अन्नापासून बॅक्टेरिया वाढतो. अशा परिस्थितीत बॅक्टेरियामुळे निर्माण झालेली दुर्गंधी घालवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करत असतो. त्याचबरोबर तोंडातील दुर्गंधी घालवण्यासाठी आपण एक सोपा पर्याय म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यायला लागतो. पण असे न करता तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती सोपे उपाय करू शकतात. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय सांगणार आहोत.

लवंग

तुमच्या तोंडातून बॅक्टेरियामुळे जर दुर्गंधी येत असेल तर तुम्ही दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने लवंग चघळायला पाहिजे. लवंग बॅक्टेरियाशी लढून दात स्वच्छ करून दुर्गंधीची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. लवंग खाल्ल्याबरोबरच त्याचा सुगंध तोंडात विरघळून दुर्गंधी दूर होते. या परिस्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवा की लवंगाचे सेवन करायचे म्हणून लवंग तेल आणि लवंग पावडरचे सेवन करणे टाळा. कारण लवंगाचे तेल आणि पावडर खाल्ल्याने जळजळ होऊ शकते.

सफरचंद आणि गाजर

विशेषतः कांदा लसूण खाल्ल्यावर तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. त्याचप्रकारे सफरचंद आणि गाजर खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होऊ शकते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सफरचंद आणि गाजर बारीक करून त्यांना दातांवर घासून स्वच्छ धुऊ शकतात. असे केल्याने तुमच्या तोंडातील दुर्गंधी तर दूर होईल पण त्याचबरोबर दात देखील स्वच्छ होतील

ॲपल साईडर व्हिनेगर

ॲपल साईडर व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही तोंडातील दुर्गंधी त्वरित दूर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे ॲपल साईडर व्हिनेगर मिसळावे लागेल. त्यानंतर या पाण्याने तुम्हाला गुळण्या कराव्या लागतील. एक ग्लास पाण्याने नियमित गुळण्या केल्यास तुमच्या तोंडातील दुर्गंधीची समस्या नाहीशी होईल.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: दात व्यवस्थित स्वच्छ न केल्याने बॅक्टेरियासाठी तोंड घर बनून जाते. परिणामी तोंड उघडताच (Bad Breath) दुर्गंधी यायला …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now