Exit Poll : महाराष्ट्र पाठोपाठ हरियाणातही कमळ खुलणार ?

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यात आज मतदान पार पडले. तर येत्या 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी काही एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोल नुसार महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना महायुतीला बहुमत मिळणार असल्याचं दिसत आहे. तर हरियाणातही भाजपलाचं बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज हरियाणात 90 जागांसाठी मतदान पार पडले. यानुसार भाजपला 72 जागा मिळणार आहेत. तर कॉंग्रेसला केवळ 8 जागांवर समाधान मानावं लागत आहे. तर इतर पक्षांना 10 जागा मिळणार आहेत. त्यामुळे हरियाणातही मनोहर लाल खट्टर यांच्याचं नेतृत्वातल सरकार येणार आहे.

तर महाराष्ट्रात फडणवीस सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे. NEWS18 लोकमतच्या एक्झिट पोलनुसार भाजपला – 144 , शिवसेनेला – 99 , राष्ट्रवादी कॉंग्रेस – 22 , कॉंग्रेस – 17 एवढ्या जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महायुतीला तब्बल 243 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर महाआघाडीचा सुपडासाफ झाल्याचा अंदाज news18 लोकमतने दिला आहे.

तसेच एबीपी माझा आणि सी ओटर्सच्या अंदाजानुसार महायुतीला 200 पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर महाआघाडीला 70 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या