Bachhu Kadu । मुंबई : सध्या गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांनी ५० खाेके घेतल्याच्या आरोपावरून राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यात यावरून चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच आता खाेके घेतले की नाही ते सांगावे, असे थेट आवाहन कडू यांनी नागपुरात दिले. तसेच रवी राणांनी पुरावे सादर करा नाहीतर १ नोव्हेंबरला मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला होता.
यासंदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी आता थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे. असली मंत्रिपदं आम्ही ओवाळून टाकतो. आम्ही राजीनामा हातात घेऊनच रस्त्यावर उतरू, असं बच्चु कडू म्हणालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही बच्चु कडू यांचं हे विधान मोठा धक्का आहे. बच्चू कडू (Bachhu Kadu) हा मंत्रिपदाचा चोमड्या नाही, असंही ते म्हणालेत.
पुढे ते म्हणाले, मी आता आमदार आहे. आधी मंत्रीही होतो. असल्या पदांचा मला लोभ नाही. असली मंत्रिपदं ओवाळून टाकतो. आम्ही रस्त्यावर उतरू तेव्हा राजीनामा आमच्या हातात असेल. तेव्हाचा बच्चु कडू काही औरच असेल, असा निर्वाणीचा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
दरम्यान, त्यांनी बोलताना रवी राणा यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “रवी राणा हा एकीकडे आम्हाला बदनाम करतो आणि दुसरीकडे मंत्रिपदाच्या रांगेत उभं राहतो. त्याच्यात लाज-लज्जा उरली नाही. ज्याच्या घरी जेवण करायचं, त्याच्याच घरावर ताट फेकून मारायचं, असा हा प्रकार आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”, असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा ; आदित्य ठाकरे यांची मागणी
- Bachhu Kadu । “ज्याच्या घरी जेवायचं त्याच्याच घरावर…”; बच्चू कडूंचा रवी राणांवर पुन्हा निशाणा
- Homestay In Manali | मनाली ट्रिप अधिक स्वस्त बनवण्यासाठी ‘या’ होमस्टे मध्ये करा मुक्काम
- Bachhu Kadu । राणा, बच्चू कडू वाद मिटवण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न; दोन्ही आमदारांना दिल्या ‘या’ सूचना
- Aditya Thackeray | “वेदांता प्रकल्प हातून गेला तेव्हाच आम्ही सांगितलं होतं…”, आदित्य ठाकरेंचा घणाघात