Share

Devendra Fadnavis । बच्चू कडू माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis । मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर, शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले होते. यानंतर आता 1 नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला आहे. तर यानंतर आता राणा यांनी यांनी शब्द मागे घेतल्याचे सांगितले आहे. यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राणा आणि कडू यांच्या वादावर भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले कि, बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. बच्चू कडू यांना मी स्वत: फोन केला. त्यांना म्हटलं की आपल्याला सरकार बनवायचंय. आमची अशी इच्छा आहे की आपण युतीत असावं. त्यामुळे आपण गुवाहाटीला गेलं पाहिजे. या माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असं फडणवीसांनी सांगितलं.

रवी राणा यांची माघार –

रवी राणा म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलवल्यानंतर ३ साडे तीन तास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. काही विचार, भाषा न पटणारी होती त्यावर देखील चर्चा झाली. बच्चू कडू आणि मी आम्ही दोघे ही सरकारसोबत आहे. जे आमदार आहेत ते सुध्दा माझे सहकारी आहेत. गुवाहाटी संदर्भात काही वाक्य निघाले असतील तर ते मी मागे घेतो. पण ज्या पध्दतीने बच्चू कडू यांनी जे वक्तव्य केलं ते न पचणारे होते. मला बच्चू कडू यांच्याकडून अपेक्षा आहे की, ते सुध्दा त्यांचे शब्द मागे घेतील.”

मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं- बच्चू कडू

याआधी राणा आणि कडू यांचा वाद सुरु असताना एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू म्हणाले कि, मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं, अशी कबुली त्यांनी दिली. आमचे आमदार राजकुमार पटेल आधी गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर मीही गेलो. पण माझं असं म्हणणं होतं की, मी जाऊन एकनाथ शिंदेंसोबत काही मुद्द्यांवर बोलून परत येईल, असं वाटलं होतं. पण हे राजकारण आहे. त्यामुळे मलसा तिथून पर येता आलं नाही. कारण आम्हीही जेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी नगरसेवकांना घेऊन बाहेर जातो. तेव्हा त्यांनही आम्ही परत फिरू देत नाही. त्यामुळे तसंच माझ्यासोबतही झालं. हे राजकारण आहे. त्यामुळे अशा गोष्टी होत असतात,असं बच्चु कडू म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis । मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर, शिंदे गटासोबत गुवाहाटीला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics