Share

Bachhu Kadu | “महाठग खिसे कापणारे आणि…”; बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर सडकून टीका

(Bachhu Kadu) अमरावती : आमदार बच्चू कडू (bachhu Kadu) यांनी पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटत फिरणारे अशी राणा दाम्पत्याची ओळख आहे, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिंदे गटाचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती. या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली.

अमरावतीत दिवाळी निमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा (Ravi Rana) हे दाम्पत्य घरोघरी मोफत किराणा वाटत आहे, यावर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचं नाव न घेता टीका केली. ‘खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाही आहेत. तसंच महाठग आणि महा औलाद कमी आहे का? असा सवाल करत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधलाय.

रवी राणा यांनीही बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. ‘जिथे पैसा असतो, तिथे बच्चू कडू असतात असं रवी राणा म्हणाले होते. बच्चूसाठी बाप बडा न भैय्या, सबसे बडा रुपय्या! अशा शब्दात त्यांनी बच्चू कडूंवर वार केला होता.

दरम्यान, आपल्याला मंत्रिपद मिळायला हवे, यासाठी अडून बसणार नाही किंवा आपण गुवाहाटीला पळून जाणार नाही. मंत्रिपद मिळायचं असो किंवा नाही मिळालं तरी, मी कायम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिपाई बनून राहीन, असं म्हणत रवी राणांनी याआधीच बच्चू कडूंना चिमटा काढला होता.

महत्वाच्या बातम्या :

(Bachhu Kadu) अमरावती : आमदार बच्चू कडू (bachhu Kadu) यांनी पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now