Share

Bacchu Kadu | इतकी बदनामी करुनही राणांवर का फिदा आहात?, बच्चू कडूंचा शिंदे सरकारला सवाल

Bacchu Kadu | मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि भाजप पक्षाचे नेते रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे समर्थक आहेत. तर बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या गटातील आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राणा आणि कडू यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले होते. त्यावेळी बैठवकीला जाण्यापूर्वी बच्चू कडू यांनी वक्तव्य केलं.

काय म्हणाले बच्चू कडू (Bacchu Kadu)

रवी रणांमुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार का फिदा आहे?, असा सवाल बच्चू कडू यांनी शिंदे सरकारला केला आहे.  कार्यकर्त्यांचे मेसेज येत आहेत. तुमचा इतका अपमान होत आहे, तुम्ही इतकी बदनामी सहन केली, सत्ताधारीच अशा प्रकारे बदनामी करत असतील तर कशाला त्यांच्यासोबत राहायचं? असं त्यांचं म्हणणं आहे. ते बरोबरच आहे. त्यांचं म्हणणं काही चुकीचं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधला, त्यावेळी ते बोलत होते. रवी राणा यांनी इतकी मोठी बदनामी केली आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, 1 तारखेला आंदोलन होणार आहे. तोडगा निघाला नाही तर आंदोलन होणारच. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ते आल्यानंतर निर्णय घेऊ.

दरम्यान, रवी राणा यांनी गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाला उत्तर देताना रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा एक तारखेला सात ते आठ आमदार घेऊन वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Bacchu Kadu | मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि भाजप पक्षाचे नेते रवी राणा (Ravi …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics