fbpx

राजांच्या नावाची कर्जमाफी अफझल खानाने लिहिली – बच्चू कडू

 

वेबटीम : राज्य सरकारकडून शेतकऱ्याना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय जाहीर करताना त्यासाठी लावण्यात आलेल्या निकषांमुळे शेतकऱ्याना कर्जमाफीचा लाभ मिळूच शकत नाही असा आरोप अनेक शेतकरी संघटना आणि राजकीय नेत्यांकडून करण्यात येथ आहे. आता याच मुद्यावरून आ. बच्चू कडू यांनी भाजपवर निशाना साधला आहे

भाजपच्या राज्य शासनाने शेतकर्‍यांना जी कर्जमाफी दिलेली आहे, त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिलेले आहे. या कर्जमाफीसाठी एवढे निकष लावलेले आहेत की, सहजासहजी कुठल्याही शेतकर्‍याला दीड लाखाची कर्जमाफी मिळणार नाही. यामुळे राजांच्या नावाची कर्जमाफी अफझल खानानेच लिहिली आहे, असे म्हणावे लागेल अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे . तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना कर्जमाफीविषयी विचारले असता ते अजून अभ्यासच चालू आहे असल्याच सांगत असल्याच हि बच्चू कडू यांनी माढा तालुक्यात झालेल्या प्रहार संघटनेचे शाखा उद्घाटन सभेवेळी बोलताना सांगितल आहे.

पुढे बच्चू कडू म्हणाले कि. राज्यकर्ते शेतकर्‍याला कर्जमाफीचे लॉलीपॉप दाखवून मते मागतात. मात्र, आम्हाला कर्जमाफी नको आहे. शेतीमालाला स्वामिनाथन आयोगानुसार उत्पादन खर्चाच्या 50 टक्के नफा धरून हमीभाव द्यावा. यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. पुढील लढा देशभरात उभारून दिल्ली दरबारी आंदोलन करून स्वामिनाथन आयोग लागू करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाग पडणारच्या इशारा यावेळी त्यांनी दिला आहे

1 Comment

Click here to post a comment