Share

Bachhu Kadu । “गरिबाच्या पोरीनं प्रेम केलं तर ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीनं केलं तर…”; बच्चू कडूंचा शरद पवारांना खोचक टोला

Bachhu Kadu । अमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यात मागील काही दिवसांपासून चांगलाच कलगीतुरा रंगलेला दिसला. रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तसेच या मेळाव्यात त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केले. यावेळी त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांवर केल्या जाणाऱ्या टीकेलाही आमदार कडूंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बच्चू कडू म्हणाले, “राजकारण हे राजकारणासारखं करावं लागेल आणि तत्त्व हे तत्त्वांसारखी पाळावी लागतील. या दोन्ही गोष्टींची सांगड घालावी लागेल. केवळ तत्त्व पाळत राहिलो आणि काम काहीच केलं नाही, तर त्या तत्त्वांना किंमत उरत नाही. लोकांच्या दु:खावर कुठेतरी मलमपट्टी करता आली पाहिजे. आम्ही उगीच गुवाहाटीला गेलो नाही. तेव्हा मी राज्यमंत्री होतो. मंत्री असतानाही मला गुवाहाटीला जाण्याची गरज काय होती? मी ज्या शेवटच्या घटकासाठी उभा राहिलो, तो घटक महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना खोचक टोला लगावलाय. शरद पवारांनी २०१४ मध्ये भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. तो त्यांच्यासाठी सोयीचा होता. पण तेव्हा कुणीही काहीच बोललं नाही. गरिबाच्या पोरीनं प्रेम केलं तर ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीनं प्रेम केलं तर त्यांचं ‘लव्ह मॅरेज’असं म्हणत त्यांनी चिमटा काढला. आमचाही उठाव होता, हम छोटे हैं लेकीन दिलदार है” अशा शब्दांत बच्चू कडूंनी फटकेबाजी केली आहे.

पुढे बोलताना कडू म्हणाले, “शिवाजी महाराजांनी तर कित्येकदा तह केले. माझ्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लागता कामा नये, या भावनेतून जेव्हा छत्रपतींनी म्यानातून तलवार बाहेर काढली, तेव्हा त्यांनी तत्त्वांशी कुठेही तडजोड केली नाही. कधी आदिलशहा तर कधी मुघलांनासोबत घेऊन महत्त्वाचं ध्येय साध्य केलं. याला तुम्ही बंडखोरी म्हणता का? असा सवाल करत त्यांनी हा उठाव असल्याचं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

Bachhu Kadu । अमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यात मागील …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now