Bachhu Kadu । मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू-रवी राणा यांच्यातील वाद मिटला असल्याचे बोलले जात असतानाच बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा रवी राणा यांना टोला लगावला. पहिली वेळ आहे म्हणून माफ आहे. यापुढे काही कराल तर प्रहारचा वार काय असतो हे दाखवून देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना नाव न घेता दिला.
यावर रवी राणांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “हा वाद आता मिटला आहे. पण कोणी मला दम देत असेल, तर रवी राणाने उद्धव ठाकरें दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय असल्याची टीका रवी राणा (Ravi Rana) यांनी केली. त्यावर बच्चू कडू यांनीही प्रतिउत्तर दिलं आहे.
“रवी राणांनी तलवार घेऊन यावे, मी फुल घेऊन तयार आहे. त्यांना किती तुकडे माझ्या शरीराचे करायचे आहेत, त्यांनी सांगावे. मी हात सुद्धा लावणार नाही. त्यांनी तारीख सांगावी, मी मरण्यासाठी तयार राहतो. कोणत्या चौकात येऊ हे सुद्धा बोलावे. प्रहारच्या सभेत बोलताना कोणाचेही नावं घेतलं नव्हतं,” असेही बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी स्पष्ट केलं. “राणांच्या वक्तव्याची दखल घ्यावी वाटत नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. मी निवडून यायचं की नाही, हे जनता ठरवेल,” असेही बच्चू कडू म्हणालेत.
काय म्हणाले होते रवी राणा ?
बच्चू कडू जर दम देऊन बोलत असेल, तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली. “प्रेमाच्या भाषेवर रवी राणा एकदा नाही, तर दहादा माघार घायला तयार आहे. पण कोणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारायचीपण हिंमत आहे”, अशा इशाराही त्यांनी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांना दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Sambhaji Bhide | महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; “आधी कुंकू लाव, मगच…”
- Ravi Rana । “दम दिला तर घरात घुसून…”; बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्यावर रवी राणांचा पलटवार
- Aravind Sawant | अरविंद सावंतांचा शिंदे गटावर निशाणा; म्हणाले, “चाळीस आमदारांना गाडण्यासाठी…”
- Sushma Andhare | गुलाबराव पाटील गद्दारीचा शिक्का घेऊन फिरतात ; सुषमा अंधारेंचा घणाघात
- Sushma Andhare | बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक तर गुवाहटीला जाण्याची गरज का पडली – सुषमा अंधारे