Share

Bachhu Kadu । “ज्याच्या घरी जेवायचं त्याच्याच घरावर…”; बच्चू कडूंचा रवी राणांवर पुन्हा निशाणा

Bachhu Kadu । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यात वाद पेटलेला आहे. गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडूंनी खोके घेतले, असा आरोप रवी राणांनी केला होता. यावर बच्चू कडू यांनी पुरावे सादर करा नाहीतर १ नोव्हेंबरला मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत असतानाच बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा रवी राणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

रवी राणा यांनी आरोप करताना भान बाळगलं पाहिजे. जर आम्ही खोके घेतले तर दिले कुणी असा प्रश्नही उपस्थित होतो. त्याचंही उत्तर रवी राणा यांनी द्याव, असं बच्चु कडू म्हणालेत. तसंच राणा यांनी जे आरोप केलेत ते माझ्या एकट्यावर नाहीत, तर ते सर्व शिंदे समर्थक आमदारांवर आहे. त्यामुळे या आरोपांचा खुलासा व्हायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, “रवी राणा हा एकीकडे आम्हाला बदनाम करतो आणि दुसरीकडे मंत्रिपदाच्या रांगेत उभं राहतो. त्याच्यात लाज-लज्जा उरली नाही. ज्याच्या घरी जेवण करायचं, त्याच्याच घरावर ताट फेकून मारायचं, असा हा प्रकार आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही” असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारलाही इशारा दिला आहे. बच्चू कडू (Bachhu Kadu) हा मंत्रिपदाचा चोमड्या नाही. अशी मंत्रिपदं आम्ही ओवाळून टाकतो. जेव्हा मैदानात उतरायचं असेल तेव्हा आमदारकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरेन, असा इशारा त्यांनी दिलाय.

महत्वाच्या बातम्या :

Bachhu Kadu । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachhu Kadu) …

पुढे वाचा

Diwali Artical Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now