तुमच्यामागे मोदी असतील, तर आमच्यामागे छत्रपती आहेत;बच्चू कडूंची विखे पाटलांवर टीका

टीम महाराष्ट्र देशा- निवडणुकीत काँग्रेस व भाजपचे साटेलोटे होते. मुख्यमंत्री व विखेंचे प्रेम म्हणजे राधाकृष्णाचे प्रेम आहे.विखेंची अख्खी खानदान भाजपत गेली, याचा काय अर्थ आहे, जर तुमच्यामागे मोदी असतील, तर आमच्यामागे छत्रपती आहेत असं म्हणत भाजपच्या वाटेवर असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांवर आमदार बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत टीका केली आहे.

सोमवारी जामखेड येथे आयोजित सभेत बच्चू कडू बोलत होते.विरोधी पक्षनेतेच जर भाजपला साथ देत असतील, तर सरकारकडून काय अपेक्षा करणार,असा सवाल यावेळी बच्चू कडू यांनी उपस्थित केला. ऊस प्रश्न, पाणी, दुष्काळ आदी महत्त्वाच्या मुद्यांवरून सरकारला कडू यांनी चांगलेच धारेवर धरले.ज्या नगरमध्ये उसाच्या भावासाठी लढणा-यांवर गोळ्या चालवल्या जातात त्याच नगरमध्ये कमळ कसे खुलते? असा प्रश्न बच्चू कडू यांनी केला.

Loading...

बच्चू कडू पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूकीचे निकाल पाहता सर्वसामान्य माणसाने कोणत्या विचाराने मतदान केले याचे मला नवल वाटले. शेतक-यांसाठी काम करणारा राजू शेट्टींसारखा खासदार पडतो आणि शेतक-यांना शिव्या देणारा रावसाहेब दानवेंसारखा निवडून येतो’ असे म्हणत ‘ही व्यवस्था अशीच चालू राहिली तर आमच्यासारखा कार्यकर्ता टिकणार नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...