जिल्हा बँका लुटणाऱ्या नेत्यांना चड्डीवर वापस पाठवलं पाहिजे : बच्चू कडू

पुणे : राज्यभरातील जिल्हा बँकाच्या स्थितीवरून सर्वपक्षीय नेत्यांना आमदार बच्चू कडू यांनी फटकारले आहे. .बलाढ्य नेत्यांना कर्ज देणे,कारखाना यांचा,बँक यांची फक्त या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचं काम यांनी केलं. आपल्या मायसोबत बेईमानी करावी अशा पद्धतीने हे नेते वागले आहेत. यांना मतदानातून चटका देण्यापेक्षा यांना भर रस्त्यात मारलं पाहिजे,यांना चड्डीवर वापस पाठवलं पाहिजे अशी टीका कडू यांनी  केली. ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत कडू यांनी जिल्हा बँक लुटणाऱ्या पुढाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू

Loading...

जिल्हा बँका शेतकऱ्यांच्या आहेत मात्र या सगळ्या नालायक लोकांनी या बँका लुटल्या.याला राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले तेवढेच जबाबदार आहेत.साठ वर्षे जिल्हा बँकांनी वाटोळे केलं.बलाढ्य नेत्यांना कर्ज देणे,कारखाना यांचा,बँक यांची फक्त या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचं काम यांनी केलं. आपल्या मायसोबत बेईमानी करावी अशा पद्धतीने हे नेते वागले आहेत. यांना मतदानातून चटका देण्यापेक्षा यांना भर रस्त्यात मारलं पाहिजे.यांना चड्डीवर वापस पाठवलं पाहिजे अशी हि नालायक लोकं असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या बँका अश्या वाईट अवस्थेत येण्यासाठी हीच मंडळी कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

… तर दानवेंना घरात घुसून मारेल- बच्चू कडू
दानवेंनी शेतकऱ्यांना फक्त साल्या म्हंटलं होतं, दानवेच्या घरात जाऊन ऊबंरठ्यावर जाऊन सांगितल की साल्या आता शिव्या दिल्या तर घरात घुसून मारेल. कारण शेतकरी आमची जात आहे शेतकरी आमचा धर्म आहे. दानवे आणि बच्चु कडु यांच्यातील हा वाद नाही.तर शेतक-याला शिव्या शाप देणा-या साल्या म्हणणा-या दानवेविरोधातील ही लढाई आहे.हरामखोरीनं कमावलेला पैसा दानवेवकडे आहे, पोरासाठी तो 200 कोटी रुपये खर्च करतो.आणि असा हा भ्रष्टाचारी दानवे, न खाऊगा न खाने दुगां अस म्हणणा-या मोदीसाहेबांच्या भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. म्हणजे यावरूच हे लोक किती भामटे आहेत. ते दिसत. अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलीये.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
'त्या' घटनेमुळे जितेंद्र आव्हाडांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल !