अमरावती : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला असून त्यांनी विलगीकरणाचं कारण देत आठवड्याची मुदत मागितली आहे.
भाजप वेगवेगळ्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. तुम्ही अनेकांची ईडी चौकशी लावली परंतु भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का? असा घणाघात त्यांनी केला आहे.
राज्यात आतापर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची चौकशी लावली आहे. भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर संपती गोळा केली असून सुद्धा एकाही भाजप नेत्यांवर ईडीची चौकशी लागत नाही. तुम्ही पक्षपातीपणा करत नाही तर मग भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारत भाजपला लक्ष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बिहार निवडणुकीमधील भाजपची विजयी परंपरा पुणे पदवीधर मतदारसंघात कायम राखू’
- ‘पवार कुटुंबाचा लोमत्या …जयंत पाटलांचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका’
- भारत भालके यांच्या निधनाने जनतेच्या हाकेला धावून जाणारा लोकनेता हरपला – रामदास आठवले
- मराठा आरक्षण विषयात या सरकारने मोठा घोळ घालून ठेवला आहे : फडणवीस
- कोरोना साथीनंतरही ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार : एम. वेंकैया नायडू