निःशब्द भावनांना बच्चू कडू यांची साथ, राख झालेल्या संसाराला दिला मदतीचा हात

bachu kadu help

अहमदनगर : घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सोबतच चिमुकल्याचा सायकल देखील जळून राख होते. आपली लाडकी सायकल जळाल्याचे बघून निःशब्द झालेल्या चिमुकल्यालासह त्याच्या कुटुंबियांना राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी साथ दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोभाळणे गावात हातावर पोट भरून संसाराचा गाडा चालवित असतानाच अचानक घरांना आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्यासह चिमुकल्याच्या आवडत्या सायकलचा सांगाडा झाला. आई-वडिल घराची राख झाल्याने हताश झाले असतानाच चिमुकला मात्र सांगाडा झालेल्या सायकलकडे निःशब्द होऊन बघत बसला.

समाजमाध्यमांवर हे छायाचित्र झळकताच राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी त्या कूटूंबियांना संपूर्ण मदत करीत चिमुकल्याच्या भावनांना साद घातली व सायकल सुद्धा चिमुकल्यासाठी रवाना करीत औदार्याची भूमिका बजावली. प्रहारचे अहमदनगर येथीलपदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता,4) तातडीने सर्व साहित्य घेऊन कोभाळणे येथे दाखल झाले.

त्यांनी घर बांधणीसह संसारोपयोगी साहित्याची मदत बच्चु कडू यांच्यावतीने प्रदान करीत कुटूंबियांना आणखी मदतीचा शब्द दिला. यामुळे कुटुंबाला पुन्हा संसार उभा करण्यास मोलाची साथ मिळाली असून चिमुकल्याला देखील धीर मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या