‘पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही’

kadu

अहमदनगर : देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे.सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरु आहेत. यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना गेला म्हणून.. पण झाले काय, आज भारतातील कोरोनाचा संसर्ग जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे नियोजन करण्यात चुकले असल्याची टीका कडू यांनी केली आहे.

अहमदनगर माध्यमांशी बोलताना त्यांनी देशातील आणि त्यात महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोना संसर्गावर बोलताना मोदींवर टीका केली. देशात वैद्यकीय सेवांचा तुटवडा आहे. ऑक्सिजन मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाहीत. म्हणजे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही. उलट ते जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना हद्दपार झाला आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव आता ओसरत असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत काहीशी घट दिसून येत आहे. मात्र, तरीही अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवबाधितांची संख्या सातत्यानं वाढत असल्याचे चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP