शेतकऱ्यांना शिव्या घालणाऱ्या दानवेंच्या अंगाची सालपटे काढल्याशिवाय राहणार नाही- बच्चू कडू

अहमदनगर – शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी व शेतकऱ्यांच्या समस्यांवर लढणारी, वेळप्रसंगी आंदोलन करून अगदी तुरुंगवास झाला तरी भूमिपुत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या पारनेर तालुक्यातील काही तरुण शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या व आता अहमदनगर जिल्ह्यात व राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दमदार वाटचाल करत असलेल्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेला भावी काळात संपूर्ण राज्यभर नक्कीच शेतकरी हक्काचे व्यासपीठ म्हणून पाहतील व संघटनेचे कार्यकर्तेपण सर्वसामान्य भूमिपुत्र शेतकऱ्यांसाठी निष्कलंक, प्रामाणिक काम करतील असे गौरवोद्गार आमदार व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव व शेतकरी नेते डॉ.अजित नवले हे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय धोरडे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, सचिव किरण वाबळे, राज्य प्रवक्ते अनिल देठे, पारनेर तालुकाध्यक्ष रोहन आंधळे, उपाध्यक्ष असिफ शेख, जिल्हा उपाध्यक्ष अशोक आंधळे, उपाध्यक्ष सचिन सैद, पत्रकार संघाचे अध्यक्ष मार्तंडराव बुचुडे, माजी अध्यक्ष संजय वाघमारे, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, वनकुटेचे सरपंच अँड.राहुल झावरे, दत्ता आवारी, उद्योजक किरणशेठ डेरे, उद्योजक मच्छिन्द्रशेठ लंके हे उपस्थित होते.

Loading...

आमदार बच्चूभाऊ कडू पुढे म्हणाले की, कदाचित जातीच्या आधारावर संघटना काढल्या असत्या व कार्यक्रम ठेवला असता तर या कार्यक्रमाला मंडपात पण जागा पुरली नसती पण हक्काच्या कार्यक्रमासाठी कोणालाही वेळ नाही, जातीसाठी लोक रस्त्यावर उतरतात, एका भोंदू बाबासाठी, सिने अभिनेत्याच्या दुष्कृत्यासाठी लोक रस्त्यावर का उतरतात हाच प्रश्न पडला आहे आणि हीच आपली शोकांतिका आहे. समाजातील ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि यासाठी शेतकऱ्यांनीच आता स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारून वठणीवर आणले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यावे आपण नक्कीच आपल्या ताकदीच्या जोरावर सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ‘सळो की पळो’ करून सोडणार असल्याचे आमदार बच्चूभाऊ कडू यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीसाठी मंत्री महादेव जानकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सरकारने दूध भूकटीला भाव वाढवला पण दुधाला भाव वाढवला नाही आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाला बगल दिली व उद्योजकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली, आता आम्ही आमची मागणी मांडायला परत जाणार आहे, जर आम्हाला आमचा हक्क मिळाला नाही तर आम्ही मंत्री जानकर यांचे कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही. सरकारने गोशाळा सुरू करून नवीन धंदा सुरू केला असल्याचा आरोप आमदार बच्चूभाऊ कडू यांनी केला. ज्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्याला शिव्या घातल्या त्या दानवेंच्या अंगाची सालपटे काढल्याशिवाय राहणार नसल्याचा परत एकदा उल्लेख आमदार बच्चूभाऊ कडू यांनी केला.

भाषण केल्याने देश चालत नाही तर लोकांचा विचार करून कृतिशील काम केल्याने देशाचं कल्याण होईल, बच्चू कडूच्या विरोधात पंतप्रधान मोदी यांचे आजोबा जरी उभे राहिले तरी मी निवडणुकीत पडणार नाही असे म्हणून आमदार बच्चूभाऊ कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली. तसेच घरात बसून नुसत्या घोषणा करायच्या, आंदोलने पुकारायची सर्वसामान्य माणसाला संकटात टाकायचे आणि फक्त वोट बँक साठी कुरवाळायचे असे धंदे आता चालणार नाही, महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा हे घरात बसून बोलल्याने महाराष्ट्र राज्याचे भलं होणार नाही तर रस्त्यावर उतरून जनतेच्या कल्याणासाठी झटले पाहिजे, आता तर धनुष्यातला बाण गायब झालाय, घड्याळाचे काटे गळून पडलेत आणि पंजाची तर ना घर का ना घाटका अशी अवस्था झाली आहे असे म्हणून सर्वच राजकीय पक्षांची आमदार बच्चूभाऊ कडू यांनी यावेळी खिल्ली उडवली.

या देशात सध्या इमानदार व लुुबाडनारे या दोनच जाती शिल्लक आहेत असे दिसत आहे, प्रामाणीकपणा संपत चाललाय आणि सर्वसामान्य जनतेला त्यामुळे कोणीही वाली राहिला नसल्याचे खिन्नपणे आमदार कडू यांनी मत व्यक्त केले. यापुढील काळात भूमिपुत्र सारख्या संपूर्ण राज्यभरातील शेतकरी संघटनांच्या मदतीने शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारला धडा शिकवणार असल्याचा घणाघात आमदार बच्चूभाऊ कडू यांनी केला व त्यासाठी सर्वांनीच कामाला लागून सर्वसामान्य शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
महिला उपजिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली