Bacchu Kadu | अमरावती : अमरावती येथील प्रहार पक्षाचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि स्वाभीमान पार्टीचे रवी राणा (Ravi Rana) यांचा वाद मिटण्याची शक्यता होती. रवी राणा यांनी त्यांचे शब्द माघार घेतले आहेत. यावेळी, बच्चू कडू यांनी कार्यकर्ते आणि इतारांशी चर्चा करुन त्यांची भूमिका स्पष्ट करेल, असं सागितलं होतं. अशातच आज अमरावती येथे प्रहार मेळावा आयोजित करण्यात आला असून बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये बच्चू कडूंचे मोठे पोस्ट लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर मै झुकेंगा नही, असं लिहिण्यात आलं आहे. या पोस्टरांमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
राणा यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, बच्चू कडू (bacchu kadu) यांनी आपले शब्द मागे घेतले नसून वाद मिटल्याचं देखील स्पष्टपणे सांगितलं नाहीये. एवढंच नाही तर ज कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भूमिका जाहीर करू, असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलवल्यानंतर ३ साडे तीन तास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. काही विचार, भाषा न पटणारी होती त्यावर देखील चर्चा झाली. बच्चू कडू आणि मी आम्ही दोघे ही सरकारसोबत आहे. जे आमदार आहेत ते सुध्दा माझे सहकारी आहेत. गुवाहाटी संदर्भात काही वाक्य निघाले असतील तर ते मी मागे घेतो. पण ज्या पध्दतीने बच्चू कडू यांनी जे वक्तव्य केलं ते न पचणारे होते. मला बच्चू कडू यांच्याकडून अपेक्षा आहे की, ते सुध्दा त्यांचे शब्द मागे घेतील, असं रवी राणा यांनी म्हटलं होतं.
शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतल्याचे सांगितले. तर बच्चू कडू लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “मोरबीचा पूल पडला, हि दुर्घटना एॅक्ट ऑफ फ्राॅड म्हणावी कि…?”, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींनाच सवाल
- Eknath Khadse । बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाबाबत एकनाथ खडसे यांचा मोठा दावा
- Congress | शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करा ; राज्यपालांकडे काँग्रेसची मागणी
- Ramdas Athawale । रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर रामदास आठवलेंची भन्नाट कविता
- Eknath Shinde । वारकऱ्यांच्या अपघाती निधनाने मुख्यमंत्री हळहळले; कुटुंबियांना ५ लाखांच्या मदतीची घोषणा