Bacchu Kadu | मुंबई : अमरावती येथील आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यात चांगलाच वाद पेटताना दिसत आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या किराणा वाटपावर रवी राणा यांनी टीका केली होती. यावरुन बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी बदनामीचा आरोप करत रवी राणा (Ravi Rana) यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
20-20 वर्षे आम्ही राजकीय करिअर उभं करायला गेले असून रवी राणा यांनी माझी बदनामी केली असल्याचं बच्चू कडू म्हणाले. तसेच, मी जर पैसे घेऊन गुवाहाटीला गेलो असेल तर नक्कीच पैसे देवेंद्र फडणवीस अथवा एकनाथ शिंदेजी यांनी दिले असतील. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहोत का. तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, असा घणाघात बच्चू कडूंनी केला आहे.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून सांगता, रवी राणा यांनी आरोप केले तर पुरावे देखील द्यावे, एकीकडे आरोप करतात तर दुसरीकडे स्वतः मंत्रिपदाच्या रांगेत उभे राहता, आता आरपारची लढाई लढायला मी तयार आहे, असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे.
दरम्यान, रवी राणा यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे त्यांनी १ तारखेपर्यंत द्यावे. जर पुरावे दिले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन आणि जर पुरावे दिले नाहीत तर मी ते कायम हिजडा म्हणेल, अशा खालच्या शब्दात बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray । पाकिस्तानविरुद्ध भारताने विजय मिळवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, “तोड नाही…”
- IND VS PAK । पाकिस्तानला हरवल्यानंतर रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य, कोहलीला दिला सलाम
- T20 World Cup | विराट कोहलीला संघातून वगळण्याचा सल्ला देणाऱ्यांनी एकदा IND VS PAK सामना पाहावा
- IND VS PAK । हार्दिक मला आत्मविश्वास देत होता; विजयानंतर विराट कोहलीचा मोठा खुलासा
- IND VS PAK | पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हार्दिक पांड्या ढसाढसा रडला! म्हणाला, “आमच्यासाठी आई बापाने…”