मुंबई: एकनाथ शिंदे यांचा बंड इतिहासात कायम आठवणीत ठेवला जाईल, कारण या बंडामुळे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिंदे गटात शिवसेना नेत्यांनी शामिल होण्याचा निर्णय घेत मविआचा पाठींबा काढून घेतला. शिंदे गटात बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचाही समावेश होता. काल फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. मात्र यात बच्चू कडू यांच्याबद्दल लॉजिक म्हणावं की मॅजिक असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. या प्रकरणातून बच्चू कडू यांची निर्दोष मुक्तता झाली असून बच्चू कडू यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याने पोलिसांनी या प्रकरणाची फाईल बंद केली आहे.
सदरील तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी ९५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. सिटी कोतवाली पोलिसात बच्चू कडू यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. मात्र पुरावे सापडले नसल्याने ही फाईल बंद करण्यात आली आहे. तिकडे मविआ सरकार कोसळले आणि इकडे बच्चू कडू यांची फाईल बंद झाली, त्यामुळे अनेक चर्चा सध्या राजकारणात रंगत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Ram Satpute : “मनोरुग्ण संजय राऊतांच्या मार्गदर्शनात असणारं सरकार गेलं”, ‘भाजप’चा टोला
- Amol Mitkari : “महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून…”, अमोल मिटकरींचा भाजपवर निशाणा
- Raju Shetti : “ईडीच्या वादळात तुमचा अख्खा वाडा उद्धवस्त…”, राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला टोला
- Governor : राज्यपाल कोश्यारींनी केले ‘विशेष अधिवेशन’ स्थगित; महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा
- Jitendra Awhad : महाविकास आघाडी सरकार कोसळले! जितेंद्र आव्हाडांनी सहकाऱ्यांचे मानले आभार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<