Share

Bacchu Kadu | मुख्यमंत्र्यांकडे जाण्यापुर्वी बच्चू कडूंनी केली ‘ही’ मागणी

Bacchu Kadu | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि स्वाभीमान पक्षाचे नेते रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. हा वाद मिटवायला आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती घेत भेट ठरवली आहे. मात्र, भेटीला जाण्यापुर्वी बच्चू कडू यांनी एक मागणी केली आहे.

माझी जी बदनामी राणा यांनी केली त्याबतीत पुरावे सादर करावेत अन्यथा त्यांनी त्याबद्दल माफी मागावी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच, रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे सगळ्या आमदारांवर आरोप केल्याचं दिसून येत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

माझी आमदार रवी राणा सोबत बैठकीला बसण्याची माझी इच्छा नाही. पण मुख्यमंत्री काय म्हणतात ते पाहू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना कडू म्हणाले आहेत की, एक तारखेच्या अल्टीमेंटममध्ये सध्या फेरबदल नाही. रवी राणा उत्तर जर समाधानकारक मिळालं तरच कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ.

तसेच, बच्चू कडू यांच्या भूमिकेला काही नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे, राजू शेट्टी, गुलाबराव पाटील यांच्यासह ज्या नेत्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो, असंही कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज दुपारी तीन वाजता रवी राणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. तर संध्याकाळी आठ वाजता बच्चू कडू शिंदेंना भेटण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत. त्यामुळे या बैठकींमध्ये नक्की काय होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Bacchu Kadu | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि स्वाभीमान पक्षाचे नेते रवी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics