‘या’ अभिनेत्रीला लग्नाआधीच ‘बाळ’ ; वाचा काय आहे बातमी

टीम महाराष्ट्र देशा : होय आपण ऐकले ते खरे आहे.हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री फ्रेंच वंशाची अभिनेत्री कल्की कोचलीन हिने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अनेक दिवसांपासून कल्की तिच्या बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. त्यावरुन ती तिच्या येणाऱ्या बाळाची खूप आतुरतेने वाट पाहात असल्याचं वाटत होतं.

लग्नापूर्वीच गरोदर राहिलेल्या कल्कीने एका मुलीला जन्म दिल्यानंतर चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. कल्कीने बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गच्या बाळाला जन्म दिला आहे. कल्कीच्या बॉयफ्रेंडने त्यांच्या होणाऱ्या बाळाचं नावाचा देखील विचार केला आहे. हे एक असं नाव आहे जे मुलगा किंवा मुलगी दोघांवरही सूट करेल.

Loading...

कल्की आणि तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गने अद्याप लग्न केलं नाही. मात्र, आता लग्न करण्याचा विचार करत आहेत.कल्कीने सांगितलं होतं की ती वॉटर बर्थच्या माध्यमातून बाळाला जन्म देऊ इच्छिते. ती या गोव्याला जाऊन बाळाला जन्म देणार होती. तिचाही जन्म गोव्यात पाण्यात झाला असल्याचं कल्कीने सांगितलं होतं. मात्र, अद्याप तिची प्रसूती कुठे आणि कशाप्रकारे झाली याबाबत माहिती पुढे आलेली नाही.

कल्कीने काही महिन्यांपूर्वी ती गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यावेळी ती लग्नापूर्वी गरोदर असल्याने तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. मात्र, मी गरोदर आहे म्हणून लग्न करणार नाही, अशी ठाम भूमिका तिने घेतली होती.

दिग्दर्शक अनुराग कश्यपची कल्की पत्नी होती, तेव्हा तिचा आई होण्याला विरोध होता. कल्की आणि अनुरागचं लग्न २०११ मध्ये झालं आणि ते २०१५ मध्ये वेगळे झाले.मूळ फ्रेंच वंशीय असूनही कल्की बॉलिवूडमध्ये चांगलीच स्थिरावली आहे. २०१९ मध्ये अभय देवल सोबत प्रदर्शित झालेल्या ‘देव.डी’ चित्रपटातील तिची चंद्रमुखीची व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरली होती. त्यानंतर द गर्ल इन येलो बूट्स, शैतान, जिंदगी ना मिलेगी दोबारा, शांघाय, ये जवानी है दिवानी, मार्गारेटा विथ अ स्ट्रॉ, गली बॉय यासारखे वेगळ्या विषयाचे चित्रपट तिने केले. सोबतच नेटफ़्लीक्स च्या वेब सिरीज मधेही ती झळकली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
त्या ५० तबलिगींनी लवकरात लवकर पुढे यावे, अन्यथा....
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला 'इशारा'; मदत केली तर ठीक, अन्यथा…
निलेश राणेंचा राज्यसरकारवर घणाघात, म्हणाले....
'जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, नाहीतर लॉक डाऊन तोडून ठाण्यात दाखल होणार'
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा