बाबुराव औराळकर यांच्यामुळे कन्नड तालुक्याच्या विकासाला गती – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

औरंगाबाद : स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेल्या तत्कालीन तरुणांनी ५० ते ९० च्या दशकपर्यंत राज्यात व देशात विकासात्मक क्रांती घडवून आणली. त्याकाळात औरंगाबाद जिल्ह्यातील नेतृत्वामध्ये राज्य पातळीवर कार्य करण्याची क्षमता होती. त्या नेतृत्वात माजी आ.स्व.बाबुराव औराळकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाल्याचे, प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कन्नड येथे केले. छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने माजी आ.स्व.बाबुराव औराळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण, इनडोअर स्टेडिअमचे उद्घाटन व नामकरण तसेच ग्रंथालय इमारतीचे माजी सभापती स्व.लक्ष्मणराव मोहिते नामकरण सोहळा शनिवारी संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्व.बाबुराव औराळकर यांच्या जीवनावरील गौरव ग्रंथाचेही प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले. तर माजी आ.कल्याण काळे, संस्थेचे अध्यक्ष मानसिंग पवार, माजी आ.किशोर पाटील, माजी आ.नामदेव पवार, माजी मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नगराध्यक्षा स्वातीताई कोल्हे, संतोष कोल्हे, उद्योजक ऋषी बागला, चंद्रकांत कडलक, किरण डोणगावकर, बाळासाहेब संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, प्रास्ताविकात मानसिंग पवार म्हणाले की, आम्ही जन्मदात्यांना विसरलो नसून, मागील पिढीने घेतलेल्या कष्टाची आठवण म्हणून विविध इमारतींना त्यांचे नाव दिले. त्यांचे पुतळे उभारले. या सर्व मंडळींचे राजकीय मतभेद होते, मात्र विकास कामांसाठी ते एकत्र येत होते. या भूमीतून विकसित झालेल्या संस्थेतील सुविधांचा फायदा तालुक्यातील सर्व विद्याथ्र्यांनी उपयोग घ्यावा व तालुक्यात चांगले विद्यार्थी व खेळाडू तयार कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक आहेर, डॉ.पी.के.निकम, चंद्रकांत देशमुख, डॉ.ए.के.महाले, लक्ष्मणराव देशमुख, बाबासाहेब मोहिते, कृष्णा पाटील, अन्वर खान, अमोल निकम, अर्जुनसिंग पवार, प्राचार्य विजय भोसले सह परिसरातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.कारभारी भानुसे यांनी केले. तर आभार प्राचार्य डॉ.विजय भोसले यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या