बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला – मोदी

टीम महाराष्ट्र देशा : ७२ व्या स्वतंत्रदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लालकिल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर मोदींंनी देशाला संबोधीत केलं. २०१९ पूर्वी मोदींचं लाल किल्ल्यावरील हे शेवटचं भाषण झालं. बाजपा अध्यक्ष अमित शहा तसेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर नेते त्याचबरोबर तिन्ही सेना दलांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित आहेत. लाल किल्ला परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काय म्हणाले मोदी भाषणात :

देश नवी उंची गाठतो आहे. आजचा सूर्योदय नवी उमंग, उत्साहाला घेऊन आला आहे, आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. ‘बीज से बाजार तक’ याअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय आहे. 2022 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात किंवा शक्य झालं तर त्याआधीच भारत अंतराळात तिरंगा फडकवेल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे :
– आयुषमान योजनेचा 10 कोटी कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे.
– 25 सप्टेंबरपासून जन आरोग्य अभिनयाला सुरुवात करणार.
– ‘बीज से बाजार तक’ याअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय.
– 2022 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात किंवा शक्य झालं तर त्याआधीच भारत अंतराळात तिरंगा फडकवेल. 
– खादीची विक्री आज दुप्पट झाली आहे, त्यामुळे गरिबाच्या हातात पैसा मिळाला.

-बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
– गरिबांना न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येकानं स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षेनुसार प्रगती करावी.
– 2014पासून अनुभवलं आहे की, देशातील सव्वाशे कोटी जनतेनं फक्त सरकार बनवलं नाही, तर ते देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठीही प्रयत्नशील आहेत.

– आमच्या सरकारमध्ये कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे, कारण देशहित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. 
– 2013 मध्ये गॅस कनेक्शनसाठी जो वेग होता, तोच कायम ठेवला असता, तर प्रत्येक घरात गॅस पोहोचण्यासाठी अनेक वर्ष गेली असती.
– महान तमीळ कवी सुब्रमणियम भारतींनी लिहिलं होते, भारतानं महान राष्ट्राच्या रूपानं उंची गाठली असून, तो इतर देशांनाही प्रेरणा देतोय.

– 13 कोटी मुद्रा कर्ज, त्यापैकी 4 कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतलं, हा बदललेल्या हिंदुस्थानाचा पुरावा आहे.
– आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला.
– आमच्या सरकारमध्ये कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे, कारण देशहित आमच्यासाठी सर्वोच्च आहे.
– 2013 च्या वेगानं देशात सर्वत्र शौचालयं पोहोचवायला एक शतक लागलं असतं, सर्व गावात वीज पोहचवायला आणखी दोन दशके लागली असती.
– गावागावात ऑप्टिकल फायबर पोहोचवण्यासाठी जो वेग 2013 मध्ये होता, तोच वेग जर कायम ठेवला असता, तर त्या कामासाठी अनेक पिढ्या गेल्या असत्या.

– आपल्या देशात 12 वर्षांतून एकदा तरी निलकुरिंजी हे फूल फुलतं

– देशात आज आत्मविश्वास आहे.
– देशात नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे.
– संसदेचं अधिवेशन आदिवासींना समर्पित होतं
ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा बहाल करण्यात आला आहे
– परिश्रम आणि पराकाष्ठेमुळे देश नवनव्या उंची गाठत आहे
– आदिवासी मुला-मुलींनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला
– लष्कर देशाच्या सेवेसाठी दिवस-रात्र कार्यरत असतं
– देशाच्या मुलींनी सात समुद्र पार केले
– आदिवासी तरुणांनी तिरंग्याची शान वाढवली

– बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
– गरिबांना न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येकानं स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षेनुसार प्रगती करावी.
– 2014पासून अनुभवलं आहे की, देशातील सव्वाशे कोटी जनतेनं फक्त सरकार बनवलं नाही, तर ते देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठीही प्रयत्नशील आहेत.