fbpx

बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण म्हणजे जिजाऊ, छत्रपतींचा अपमान

टीम महारष्ट्र देशा – महाराष्ट्रातील ज्या शिवप्रेमींनी पुरंदरे यांच्यावर वेळो वेळी आक्षेप घेतला. त्यांच्या भावनेचा आदर न करता पुरंदरे यांचा सरकारकडून सातत्याने सन्मान केला गेला. बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण म्हणजे शिवद्रोहींचा सन्मान आणि जिजाऊ, छत्रपतींचा अपमान असल्याची प्रतिकिया देत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे.

केंद्र सरकारने आज रात्री उशिरा “पद्म’ पुरस्काराची घोषणा केली. 112 पुरस्कार विजेत्यांमध्ये चार “पद्मविभूषण’, 14 “पद्मभूषण’ व 94 “पद्मश्री’ विजेत्यांचा समावेश आहे. चार “पद्मविभूषण’ पुरस्कार विजेत्यांमध्ये पुरंदरे यांचाही समावेश आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमी संघटनांनी याचा विरोध करून निषेध व्यक्त करायला सुरुवात केली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यावेळी महाराष्ट्र देशाशी बोलताना म्हणले की, पुरंदरे हे आरएसएस समर्थक असल्यामुळे त्यांचा सन्मान केला आहे. आजपर्यंत आरएसएसच्याच लोकांचा सरकार सन्मान करत आले आहे. आरएसएसला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मान्य नाही, इतिहास विकृत करणाऱ्या लोकांचाच अशा पद्धतीने सन्मान करण्याची सुपारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सुपारी घेतली आहे.