fbpx

खेडमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

khed-ambedkar_

टीम महाराष्ट्र देशा- त्रिपुरामध्ये लेनिनच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्यानंतर देशभरात बऱ्याच ठिकाणी महापुराषांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचं लोण पसरलं होत. त्यानंतर विटंबना करण्याचे प्रकार थांबले असं वाटत असताना आता रत्नागिरी जवळील खेडमधील जिजामाता उद्यानातील डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच खेडमध्ये आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने जमले. शहरात पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.

खेड- दापोली मार्गावरील तीन बत्ती येथे जिजामाता उद्यान असून या उद्यानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.या पुतळ्याची रात्री समाजकंटकांनी या पुतळ्याची विटंबना केली. सकाळी साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुतळ्याची विटंबना झाल्याचे लक्षात आले. हि बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे वृत्त समजताच रिपब्लिकन पक्षांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. विटंबना करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.