fbpx

मावळमधून बाबाराजे मैदनात; लवकरच करणार उमेदवारी अर्ज दाखल?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्येक उमेदवार उमेदवारी अर्ज भरताना दिसत आहेत. आज मावळ लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरलेले बाबाराजे देशमुख यांनी आज उमेदवारी अर्ज स्वीकारला आहे. मावळ मतदार संघातून उमेदवारी अर्ज स्वीकारणारे ते पहिलेच उमेदवार आहेत.

यावेळी बाबाराजे यांनी उपस्थित असलेल्या पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की मला छत्रपतींचे गडकोट, बौद्ध लेण्या, ऐतिहासिक वास्तू यांचा जीर्णोद्धार,तरुणांना रोजगार देणे, रस्ते, वीज, पाणी, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे, पनवेलमध्ये चालू असलेल्या डान्सबारमधील नंगानाच या विरुद्ध आवाज उठवणे, त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघातील पर्यटन वाढवणे व विकास करणे, विद्यार्थीवर्गाचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, बैलगाडा शर्यतीवरील वरील बंदी, तसेच सर्व जाती वरील आरक्षण इत्यादी रखडलेल्या समस्या सोडवण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेलो आहे.

दरम्यान मावळ लोकसभा मतदार संघातून यंदाच्या निवडणुकीत आघाडी कडून पार्थ पवार आणि युती कडून श्रीरंग बारणे आमने सामने येणार आहेत. मात्र ही जरी मोठी लढत असली तरी बाबाराजे देशमुख हे देखील या निवडणुकीचे रिंगण गाजवणार आहेत.