ज्याला कोणी पोरगी देत नाही तो का मोदी-मोदी करतो; त्याचे पुतळे जाळा

Babanrao-Lonikar

भाजपमधील वाचाळ वीरांची मालिका थांबताना दिसत नाही. आधी रावसाहेब दानवेंच ‘साल्या’ प्रकरण गाजलं त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भाषा घसरली. तर आता पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा राहुल गांधीवर टीका करताना तोल गेला आहे.

लोणीकर यांनी राहुल गांधी यांच्या बोलण्याची नक्कल करत त्यांच्या वैयक्तिक जीवनावर टीका केली आहे. ‘ज्याला कोणी पोरगी देत नाही , ज्याच लग्न होत नाही तो मोदी –मोदी का करतो? भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याचे पुतळे जाळायला हवे होते,” असं लोणीकर म्हणाले आहेत.

आपल्या नेत्यावर जर कोणी टीका केली तर ‘इट का जवाब पत्थरसे द्या’, टीका करणाऱ्य़ांचे पुतळे जाळा त्यांच्या सभा उधळून लावा, त्याच्या बातम्या छापून आणा, असा हिंसक सल्ला लोणीकरांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे .

 

Loading...