बबनराव पाचपुते यांच्या गाडीला भीषण अपघात

पुणे : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातातून ते थोडक्यात बचावले. काल रात्री 10.30 च्या सुमारास शिरुरजवळ कानीफनाथ फाट्यावर हा अपघात झाला.

पाचपुते यांची कार मालवाहतूक ट्रकला धडकली. या अपघातात कारच्या समोरील बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचुर झालाय. मात्र सुदैवाने माजी मंत्री बबनराव पाचपुते सुखरूप असून, त्यांना कोणतीही इजा झाली नाहीये. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

‘त्या’ महिला पायलटने स्वतःचे प्राण देऊन वाचवले अनेकांचे जीव