fbpx

शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करूनच जमिनीचा मोबदला – बबनराव लोणीकर

Babanrao-Lonikar

टीम महाराष्ट्र देशा : परभणी जिल्ह्यातील बाभूळगाव व उजळंबा येथे 702 हेक्टर जमिनीवर एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. येथील शेतकरी ३५ लाख रुपये प्रति हेक्टरीप्रमाणे जमिनीचा मोबदला देण्याची मागणी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल, असे श्री.लोणीकर यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले. तसेच बाभूळगाव व सेलू एमआयडीसीचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना बाभूळगाव व सेलू एमआयडीसीच्या जमीन संपादनाचे दर तपासून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी यावेळी दिले

परभणी जिल्ह्यातील बाभूळगाव येथे ४38 हेक्टर, व उजळंबाला २६४ हेक्टर तर सेलूला २४६ हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी संपादित करण्यात येणार आहे. बाभूळगाव व सेलू एमआयडीसीला सर्व सेवासुविधा उपलब्ध आहेत. शिवाय दळणवळणासाठी रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि शंभर किमीवर विमानतळ आहे. तसेच एमआयडीसीसाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी पुरवठा ही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही एमआयडीसी सर्व सेवा सुविधायुक्त असणार आहे.