पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे अडचणीच्या भोवऱ्यात

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठा मध्ये याचिका दाखल करण्यात आली असून शेतकऱ्यांचे पैसे खिशात घातल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर हे अडचणीच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांकडून साखर कारखान्याच्या नावाखाली पैसे गोळा करून कारखान्यासाठी खरेदी केलेली जमीन नियमबाह्य आपल्या आणि कुटुंबीयांच्या नावावर केल्याचा दावा याचिकेमध्ये केला आहे तसेच शेतकऱ्यांची परतूर तालूक्यातील लोणी गावामधील 50 एक्कर जमीन चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या नावाने आपल्या घशात घातल्याचा गंभीर आरोप आहे.या बाबत शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती पण तक्रारीकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कानाडोळा केल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

लोणीकर यांनी 2000 साली आमदार असताना, परतूर आणि मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शेअर्सच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 5 हजारांच्या रकमा घेतल्या होत्या. त्याच्या शेतकऱ्यांना पावत्याही दिल्या. मात्र चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या नावाने शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पावत्यावरील नोंदणी क्रमांक देखील बोगस असल्याचा याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

You might also like
Comments
Loading...