fbpx

लोणीकारांनी वापरली कृषी पर्यवेक्षकाला तोंड काळंं करण्याची भाषा

Babanrao-Lonikar

टीम महाराष्ट्र देशा : पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दुष्काळ दौऱ्यावर असतांना कृषी पर्यवेक्षकाला तोंड काळंं करण्याची अर्वाच्च भाषा वापरली आहे. ये तोंड काळंं करायला ये लवकर पटकन पुढ ये, नाव घेतलं तर पटकन यायचं ना. अशी भाषा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी कृषी पर्यवेक्षकाला वापरली आहे. बबनराव लोणीकर मंठा तालुक्यात दुष्काळ दौऱ्यावर होते.

राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व पक्षांनी दुष्काळी दौरे सुरु केले आहेत. याचदरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर जिल्हा दौऱ्यावर होते. दरम्यान मंठा तालुक्यातील शिवनगिरी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. या दुष्काळी पाहणीत नागरिकांनी गावात तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषीसेवक, आरोग्यसेवक, लाईनमन हे महिना- महिना येत नसल्याची तक्रार केली. इतकेच नव्हे तर, मतदारसंघात सरकारी कर्मचारी व अधिका-यांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहीला नाही. तसेच राष्ट्रीयकृत बँकेतही सर्वसामान्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.

त्यावेळी नागरिकांना गावात पाणी, जनावरांना चारा व मजुरांना काम मिळाले नाही तर संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई होईल, नागरिकांनी दुष्काळात घाबरून जाण्याचे कारण नाही. यावर्षी चांगला पाऊस व चांगले पीक येईल. असे बबनराव लोणीकर यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, उपस्थित शासकीय कर्मचाऱ्यात कृषी अधिकाऱ्याची विचारणा केली असता, उपस्थित असलेल्या कृषी पर्यवेक्षक दादासाहेब तुपे यांना ये तोंड काळंं करायला ये लवकर पटकन पुढ ये, नाव घेतलं तर पटकन यायचं ना. अशी भाषा बबनराव लोणीकर यांनी वापरली.