राष्ट्रवादीचे आ.बबनराव शिंदे भाजपाच्या वाटेवर ?

babanraw shinde

कुर्डूवाडी / हर्षल बागल : माढा तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी भाजपा मध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. माढा तालुक्यातील शिराळा येथे एका सत्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करित असताना आ. बबनराव शिंदे भाजपा तालुका अध्यक्ष संजय कोकाटे यांना ऊद्देशुन म्हणाले की .. ‘अजुन तुमची ऊमेदवारी फिक्स नाही , राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, कदाचित भविष्यात तुम्हालाच माझा प्रचार करावा लागेल’. असे म्हणत राष्ट्रवादीच्या गोटात आ. शिंदे यांनी खळबळ ऊडवुन दिली आहे.

काही दिवसापुर्वी कुर्डूवाडीच्या एका जाहिर सभेत बोलताना खा. शरद पवार यांनी आ.बबनराव शिंदे यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. याचा अर्थ घेऊन कदाचित आपल्याला आगामी काळात पवारांकडुन राष्ट्रवादीचे तिकीट मिळणार नसल्याचे लक्षात घेऊन वरील विधान काल शिराळ येथे आ. शिंदे यांनी करुन पवार यांना इशारा दिला आहे. पण या वक्तव्यामुळे मात्र माढा तालुक्यासह राष्ट्रवादीच्या गोटात चांगलीच खळबळ ऊडाली आहे.विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते खा. विजयसिंह मोहिते पाटिल यांच्या समोरच आ. बबनराव शिंदे यांनी हे संकेत देऊन राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा असलेल्या शरद पवरांना जणू इशारा दिला आहे.

सुशील कुमार शिंदेंनी सांगितला पवारांचा खोडकर किस्सा

सोलापूर : शेतकरी फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात गुन्हा

VIDEO: बीडमध्ये राष्ट्रवादीच्या दुफळीचा ‘हल्लाबोल’