उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची पवारांची चाल लक्षात आल्याने सुजयला भाजपात घेतले

टीम महाराष्ट्र देशा : डॉ.सुजय विखे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळत होती. पण मीच त्यांना राष्ट्रवादीत जाण्यात रोखले. कारण उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची चाल आपल्या लक्षात आली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी केली. भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते

खासदार दिलीप गांधींनी मतदारसंघात चांगली केली पण सर्व्हेत डॉ. सुजय विखे यांचे नाव पुढे होत. सुजय विखेंना भाजपात घ्या आणि उमेदवारी द्या असे आपणच दोन महिन्यांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते. विखेंना उमेदवारी मिळाली असली तरी खासदार दिलीप गांधी हेही लवकरच प्रचार यंत्रणेत सहभागी होतील, अशी माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोदा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली.