कोरोनावर मात करण्याची क्षमता कोरोनिलमध्ये आहे हा बाबा रामदेव यांचा दावा फोल : राष्ट्रवादी

koronil

मुंबई : जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना अनेक संस्थांकडून कोरोना लसीचे संशोधन सुरू होते. याच काळामध्ये देशात योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’नं कोरोनील या औषधाचा कोरोनावरील आयुर्वेदिक औषध असा कोरोनिलचा प्रचार कंपनीकडून करण्यात आला होता.

कोरोना व्हायरसवरचे अधिकृत तथा प्रमाणित औषध योगगुरु रामदेव बाबा यांनी बाजारात आणले आहे. या औषधाचे कोरोनील असे नाव असून या औषधाच्या विक्रीवर महाराष्ट्रात राज्य सरकारने विक्रीवर बंदी घातल्यामुळे रामदेव बाबा यांना मोठा झटका बसला आहे.

रामदेव बाबांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून मोठा झटका दिला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीने देखील कोरोनिल या औषधाबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. पतंजलीच्या कोरोनावरील कोरोनिल या औषधाला कोणत्याही प्रकारची मान्यता दिली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. कोरोनिल या गोळीत कोरोनावर मात करण्याची क्षमता आहे हा बाबा रामदेव यांचा दावा यामुळे फोल ठरला असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

तसेच केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनील या औषध निर्माणावेळी कोणते संशोधन करण्यात आलेले होते? व कोरोनील या औषधाला कोणत्या प्रकरची मान्यता केंद शासनाने दिलेले आहे? याचे उत्तर द्यावे अशी मागणी देखील यावेळी तपासे यांनी केलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या