रामदेव बाबांच्या औषधाने बरा होणार कोरोना! नेमक आहे तरी काय औषधात

baba ramdev launch tablet on covid 19

नवी दिल्ली : कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. जगभरातील रुग्णसंख्या ९२ लाखांवर पोहचलीय तर ४ लाख ७४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर ४९ लाख ५६ हजार जणांची कोरोनाच्या आजारातून मुक्तता झाली आहे. भारतामध्ये देखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. एका बाजूला कोरोनाचा विळखा वाढत असताना दुसरीकडे त्यावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्यावर हजारो डॉक्टर वैज्ञानिक काम करत आहेत. आता योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनातून १०० टक्के बरे करणारे औषध आणले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची दवाखान्याला भेट, फिजिकल डिस्टन्सचे वाजले तीन तेरा !

बाबा रामदेव यांची संस्था पतंजलीने कोरोनावर आधारित ‘कोरोनील’ हे पहिलं आयुर्वेदिक औषधं जगासमोर आणल आहे. आचार्य बालकृष्ण यांनी स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत रिद्वारच्या पतंजली योगपीठात हे औषध लॉन्च केले आहे.

मोठी बातमी : यंदा भारतीयांना हज यात्रेला जाता येणार नाही, पैसे मिळणार परत

यावेळी संपूर्ण देश आणि जग कोरोनावरील औषध निघेल या आशेवर होतं. आम्ही कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं शोधलं आहे, पतंजली संशोधन संस्था आणि निम्स यांच्या संयुक्त विद्यमाने या औषधाचं संशोधन करण्यात आलं. ही औषधं वैद्यकीय तपासण्या आणि चाचण्यांमध्ये देखील सिद्ध झालं आहे. यासाठी मी या संशोधनातील सर्व वैज्ञानिकांचे आणि संशोधकांचे आभार मानतो, असं बाबा रामदेव यांनी म्हंटल आहे.

शैक्षणिक ‘जगबुडी’पासून संजय राऊत आता तुम्हीच वाचवा, शेलारांची खोचक टीका

नेमक काय आहे रामदेव यांच्या औषधामध्ये

कोरोनिलमध्ये गिलोय, अश्‍वगंधा, तुलसी, श्‍वसारी रस आणि अणू तेलाचे मिश्रण आहे. हे औषध दिवसातून दोन वेळा घ्यावे लागणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी या औषधाचे दररोज सेवन करावे लागणार आहे. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं.

कोरोनिल औषध तयार करण्यासाठी दोन प्रकारे उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला आहे क्लिनिकल कंट्रोल स्टडी आणि क्लिनिकल कंट्रोल ट्राय या पद्धतीचा वापर केला असल्याचं रामदेव यांनी सांगितलं. क्लिनिकल कंट्रोल स्टडीसाठी दिल्ली, मेरठसह देशातील इतर भागात अनेक रुग्णांवर प्रयोग केले. यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.