हे गंजाडी देशाचे आदर्श असूच शकत नाही – बाबा रामदेव

ganjadi

नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगलच्या तपासणीत एनसीबी सक्रिय आहे. या चौकशीत अनेक सेलिब्रिटींची नावं अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांमध्ये आधीच आलं आहे. तर अनेकांची नावं अजूनही बाहेर येणं बाकी आहे. शनिवारी (२६ सप्टेंबर) दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची स्वतंत्रपणे चौकशी केली गेली. दीपिका सकाळी १० वाजता एनसीबीच्या गेस्ट हाउसवर चौकशीसाठी पोहोचली होती.

या सगळ्या प्रकरणावर आता योगगुरू स्वामी रामदेव यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे गंजाडी देशाचे आदर्श असूच शकत नाहीत, हे नशेच्या नरकातील किडे आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका बाबा रामदेव यांनी घेतली आहे.

तर चूप राहणे म्हणजे समर्थन दिल्यासारखे असून खोट्या ला खोट म्हणण्याची हिम्मत ठेवण्याचे आवाहन त्यांनी बॉलीवूड सिताऱ्यांना केले आहे. तर मी सगळ्या मोठ्या अभिनेते आणि अभिनेत्रीना आवाहना करतो पुढे येऊन त्यांनी बॉलीवूड मधील घाण साफ करावी अस देखील बाबा रामदेव म्हणाले आहते. तर सुशांत सिंग राजपूत हा आत्महत्या करणारा मुलगा नव्हता त्याला मारलं आहे. त्याला जबरदस्ती ड्रग्ज दिले गेल्याचा दावा देखील बाबा रामदेव यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या